महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई कोरोना अपडेट - 461 नवीन रुग्णांची नोंद, 3 मृत्यू - covid 19 in mumbai

मुंबईत आज 461 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 15 हजार 030 वर पोहचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 423 वर पोहचला आहे.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Feb 16, 2021, 7:44 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. रविवारी 645, काल सोमवारी 493 रुग्ण आढळून आले होते. त्यात काहीशी घट झाली असून आज (मंगळवारी) कोरोनाचे 461 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची आकडेवारी -

मुंबईत आज 461 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 15 हजारावर पोहचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 423 वर पोहचला आहे. 340 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 97 हजार 101 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5649 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 445 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 76 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 810 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 30 लाख 39 हजार 461 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्णसंख्या वाढली होती -

मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. रविवारी 14 फेब्रुवारीला 645, काल सोमवारी 15 फेब्रुवारीला 493 रुग्ण आढळून आले होते.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा-'सुशांतसिंह प्रकरणात भाजपातील काही लोकांचा समावेश'

ABOUT THE AUTHOR

...view details