मुंबई -मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The third wave of corona virus ) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले काही दिवस ५० आत व नंतर १०० वर रुग्ण आढळून येत होते. गेले काही दिवस रुग्णसंख्या २०० च्या वर गेली आहे. आज बुधवारी त्यात घट होऊन २९५ नव्या रुग्णांची ( 295 new patients ) नोंद झाली आहे. तर शून्य मृत्यूची नोंद (deaths) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे ( Mumbai Corona Update ) होण्याचा दर ९८ टक्के असून १५३१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
२९५ नवे रुग्ण :मुंबईत आज बुधवारी २९५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६३ हजार ५७१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४२ हजार ४७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १५३१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३९७३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१७ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या २९५ रुग्णांपैकी २८३ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४८७ बेड्स असून त्यापैकी ६३ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.