मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( third wave of corona virus ) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात वाढ होऊन १०० च्या वर रुग्णसंख्या नोंद होत आहे. आज गुरुवारी रुग्णसंख्या २०० च्या पार झाली असून २२३ नव्या रुग्णांची ( 223 new Corona patients Mumbai ) तर शून्य मृत्यूची नोंद ( deaths) झाली आहे. मुंबईत सध्या ( Mumbai Corona Update ) रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १०८६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
२२३ नवे रुग्ण :मुंबईत आज गुरूवारी २२३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६२ हजार २६३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४१ हजार ६११ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०८६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५११३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१३ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या २२३ रुग्णांपैकी २१६ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ५१० बेड्स असून त्यापैकी ३५ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.