मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून आज मुंबईत २०९ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १९०० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Mumbai Corona Update - मुंबईत आज २०९ रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही, सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटतेय
आज मुंबईत २०९ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे (Mumbai Corona Update). सध्या १९०० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत २०९ नवे कोरोना रुग्ण - मुंबईत आज १० सप्टेंबरला ७,८३० चाचण्या करण्यात आल्या. त्यात २०९ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ३९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४७ हजार ७९१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २६ हजार १७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९०० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २७३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२६ टक्के इतका आहे.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५०च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, ४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६, ८ सप्टेंबरला २९०, ९ सप्टेंबरला २५१, १० सप्टेंबरला २०९ रुग्णांची नोंद झाली आहे.