मुंबई - मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 1,217 नवे रुग्ण आढळून आले असून, 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 42 हजार 099 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 562 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1,241 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 14 हजार 818 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 401 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 30 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांपैकी 20 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 20 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1241 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 14 हजार 818 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 42 हजार 099 रुग्ण असून 1 लाख 14 हजार 818 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 562 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 401 सक्रिय रुग्ण आहेत.