मुंबई -मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या ( Mumbai Corona Update ) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. मात्र रविवारी चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्येत घट झाली आहे. आज ( सोमवारी ) १११८ रुग्णांची नोंद ( 1118 New corona patients Mumbai ) झाली आहे. काल ( रविवारी ) २ मृत्यूंची नोंद झाली होती. आज शून्य मृत्यूची नोंद होत होती. मुंबईत सध्या ४७८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ३३ रुग्ण ऑक्सिजनवर, ६४ रुग्ण आयसीयूमध्ये तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर बी ए व्हरेरियंटचे ४ रुग्ण आढळून आले असून ते बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
११ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह :मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात ९६२२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १११८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ११ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ६७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ८१ हजार ८६५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५० हजार ९६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११ हजार ३३१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४७५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१४४ टक्के इतका आहे.
८ रुग्ण व्हेंटिलेटरवर :मुंबईत आज आढळून आलेल्या १११८ रुग्णांपैकी १०४६ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८७७ बेड्स असून त्यापैकी ४७८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ३३ रुग्ण ऑक्सिजनवर, ६४ रुग्ण आयसीयूमध्ये तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.