मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे ( Corona's Third Wave in Mumbai ). जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत ( Corona Patients Decreased In Mumbai ) आहे. सोमवारी ३६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात सलग ३ दिवस ४०० च्या वर रुग्ण आढळून आले. आज शुक्रवारी किंचित घट होऊन ३६७ रुग्णांची नोंद झाली ( New Covid Patients In Mumbai ) आहे. आज १ मृत्यूची नोंद करण्यात आली ( Covid Deaths In Mumbai ) आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के तर, ३३१९ सक्रिय रुग्ण आहेत.
३६७ नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (११ फेब्रुवारीला) ३६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५३ हजार ४१३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३० हजार ६६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२१९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०५५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे.
९६.८ टक्के बेड रिक्त