मुंबई:मुंबईत गेल्या अडीच वर्षांपासून असलेला कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाला असून आज १०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ७३२ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या (BMC health department) आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईत आज २५ सप्टेंबरला ६७३० चाचण्या करण्यात आल्या. त्यात १०८ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४९ हजार ७८१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २९ हजार ३२० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७३२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients )आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७६१९ दिवस इतका आहे.
Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचे १०८ नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही - BMC health department
मुंबईत आता कोरोना पुरता आटोक्यात आल्याचे चित्र आहे. दिवसभरात मुंबईत कोरोनाचे १०८ नवे रुग्ण सापडले असून मृत्यूचा आकडा शुन्यावर आला आहे. आज शहरात ६७३० चाचण्या करण्यात आल्या. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००९ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या घटतेय मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००९ टक्के इतका आहे. मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट
झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.
१२७ वेळा शून्य मृत्यूची नोंदमुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १२७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.