मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले काही दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या ( Mumbai Corona Update ) संख्येत किंचित घट होऊ लागली आहे. पालिकेकडून चाचण्या कमी केल्या जात असल्याने आज ( सोमवारी ) १०६२ रुग्णांची नोंद झाली ( 1062 New Corona patients Mumbai ) आहे. आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६६८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
११.९९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह :मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ८४५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १०६२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ११.९९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ५ मृत्यूची नोंद झाली आहे. १३०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ८ हजार ४३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७६ हजार ३५० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ४७९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१५१ टक्के इतका आहे.
२१ रुग्ण व्हेंटिलेटरवर :मुंबईत आज आढळून आलेल्या १०६२ रुग्णांपैकी १३०५ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ७६८ बेड्स असून त्यापैकी ६६८ बेडवर रुग्ण आहेत. ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.