मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. धारावीत आज 76 नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 1,039 वर गेली आहे. दादरमध्ये नवे 108 रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या 1,757 वर तर महिममध्ये 125 नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रूग्णांची संख्या 1,933 वर पोहचली आहे.
धारावीत 1039 अॅक्टिव्ह रुग्ण -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 2 फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात 334 रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात 8 ते 11 हजारावर गेली. धारावीतही काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. धारावीत 8 मार्चला दिवसभरात 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 18 मार्चला ही रुग्णसंख्या 30 वर पोहचली होती. आज धारावीत 76 नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण 5676 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4319 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1039 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
माहिममध्ये 1933 सक्रिय रुग्ण -