मुंबई - मुंबईत जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले पाच दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासात चाचण्या कमी झाल्याने १ हजार ८९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६,६५ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७७ रुग्ण ऑक्सिजनवर असून १५८ रुग्ण आयसीयूमध्ये आहे. तसेच १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
१२.७० टक्के रुग्ण पॉजिटीव्ह -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार ९४४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार ८९८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १२.७० टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. तर, आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३ हजार ७६० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७० हजार ९१२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार २५७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ३८६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१७३ टक्के इतका आहे.
१८ रुग्ण व्हेंटिलेटरवर -मुंबईत आज आढळून आलेल्या १ हजार ८९८ रुग्णांपैकी १ हजार ८०२ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ७७२ बेड्स असून त्यापैकी ६,६५ बेडवर रुग्ण आहेत. ७७ रुग्ण ऑक्सिजनवर, १५८ रुग्ण आयसीयूमध्ये तर, १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.