मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third wave of corona virus ) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Covid Patients Decreased ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन २६ एप्रिलला १०२ तर, काल २७ एप्रिलला ११२ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन काल ५६ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात वाढ होऊन पुन्हा १०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद ( Covid Deaths Mumbai ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ६३७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
१०० नवे रुग्ण - मुंबईत आज मंगळवारी १०० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६० हजार ०७० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३९ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६३७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८०७९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००८ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १०० रुग्णांपैकी ९८ म्हणजेच ९८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ००९ बेड्स असून त्यापैकी १५ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२, १३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१, २२ एप्रिलला ६८, २३ एप्रिलला ७२, २४ एप्रिलला ७३, २५ एप्रिलला ४५, २६ एप्रिलला १०२, २७ एप्रिलला ११२, २८ एप्रिलला ९०, २९ एप्रिलला ९३, ३० एप्रिलला ९४, १ मे ला ९२, २ मे ला ५६, ३ मे ला १०० रुग्णांची नोंद झाली आहे.
७४ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ७४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा : Police Alert : राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट; गुप्तचर यंत्रणा अलर्ट