मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज शुक्रवारी मुंबईत 2 हजार 172 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मागील २४ तासात मुंबईत २ हजार १७२ रुग्णांची नोंद, ४४ रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट
राजधानी मुंबईत कोरोना संक्रमणात झपाट्याने वाढ होत. वाढते संक्रमण पाहता पालिककडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, मागील ३ दिवसांपासून शहरात २ हजरांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे,
शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 2 हजार 172 नवे रुग्ण आढळून आले असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 26 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष तर 14 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 65 हजार 287 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 064 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1132 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 29 हजार 244 वर गेला आहे. सध्या मुंबईत 27 हजार 626 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 58 दिवस तर सरासरी दर 1.20 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 542 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 7 हजार 217 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 8 लाख 87 हजार 274 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.