मुंबई - राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना शहरातील परिस्थिती देखील चिंताजनक आहे. मुंबईत आतापर्यंत 3445 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामधील 408 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 2887 रुग्ण अद्याप अॅक्टीव्ह असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
मुंबईत 2889 रुग्ण 'अॅक्टिव्ह'; तर, आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू - covid-19 in mumbai
मुंबईत आतापर्यंत 3445 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामधील 408 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 2887 रुग्ण अद्याप अॅक्टीव्ह असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
मुंबईत आतापर्यंत 3445 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामधील 408 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत शहरात 150 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे सावट आणखी गडद होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असले, तरिही शहरातील काही ठिकाणी नागरिक अनावश्यक गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.