महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किंचित दिलासा ; मुंबईत 8 हजार 938 नवे रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत 8 हजार 938 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 91 हजार 698 वर पोहचला आहे. आज 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 874 वर पोहचला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Apr 8, 2021, 10:36 PM IST

मुंबई- मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवस 10 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले होते. आज (गुरुवार) काही प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट झाली. आज 8 हजार 938 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

86 हजार 279 सक्रिय रुग्ण-

मुंबईत 8 हजार 938 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 91 हजार 698 वर पोहचला आहे. आज 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 874 वर पोहचला आहे. 4503 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 92 हजार 514 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 86 हजार 279 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 71 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 750 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 44 लाख 54 हजार 140 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

'हे' विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -

गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवानरीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details