महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत घट, आज ५३६ नव्या रुग्णांची नोंद, तर 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना रुग्णसंख्या

मुंबईत आज (६ फेब्रुवारीला) ५३६ नवे रुग्ण ( Todays Corona Patient In Mumbai ) आढळून आले आहेत. तर ३ मृत्यूची नोंद ( Mumbai Corona Patient Death ) झाली आहे. आज ११५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५१ हजार ३७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २६ हजार १४४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५७४३ सक्रिय ( Total Active Patient In Mumbai ) रुग्ण आहेत.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

By

Published : Feb 6, 2022, 8:00 PM IST

मुंबई -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. यादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (६ फेब्रुवारीला) ५३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ११५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५१ हजार ३७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २६ हजार १४४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५७४३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७३० दिवस इतका आहे. मुंबईमधील केवळ १ इमारत सील आहेत. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.१० टक्के इतका आहे.

९४.१ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या ५३६ रुग्णांपैकी ४४० म्हणजेच ८२ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ९८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २४ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,१२२ बेडस असून त्यापैकी १४९९ बेडवर म्हणजेच ४ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९६ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या घटते आहे -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून २४ जानेवारीला १८५७, २५ जानेवारीला १८१५, २६ जानेवारीला १८५८ रुग्ण आढळून आले. त्यानंतर त्यात आणखी घट होऊन ३१ जानेवारीला ९६०, १ फेब्रुवारीला ८०३, २ फेब्रुवारीला ११२८, ३ फेब्रुवारीला ८२७, ४ फेब्रुवारीला ८४६, ५ फेब्रुवारीला ६४३, ६ फेब्रुवारीला ५३६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Lata Mangeshkar Mangeshi Temple Goa : लता मंगेशकरांचा गोव्याशी आहे खास संबंध.. 'या' मंदिरात वडील करायचे गायन, पुजारी म्हणाले..

ABOUT THE AUTHOR

...view details