मुंबई कोरोना अपडेट : रुग्णसंख्येत चढ उतार सुरू, 762 नवे रुग्ण - मुंबईत 762 नवे रुग्ण
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार सुरू आहे. शुक्रवारी शहरात 762 नवे रुग्ण आढळले
![मुंबई कोरोना अपडेट : रुग्णसंख्येत चढ उतार सुरू, 762 नवे रुग्ण Mumbai Corona patient population is fluctuating and 762 new patients have been identified](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12183759-812-12183759-1624030472748.jpg)
मुंबई -शहरात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. सोमवार, मंगळवारी या दोन दिवसात पाचशेच्या घरात रुग्ण आढळून आले. बुधवारी त्यात वाढ होऊन 830 रुग्ण आढळून आले, गुरुवारी पून्हा रुग्णसंख्या कमी होऊन 666 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी त्यात किंचित वाढ होऊन 762 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून 684 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 734 दिवसांवर पोहचला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 734 दिवसांवर -
मुंबईत शुक्रवारी 762 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 19 हजार 941 वर पोहचला आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 266 वर पोहचला आहे. आज 684 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 87 हजार 550वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 14 हजार 860 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 734 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 18 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 85 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 30 हजार 447 तर आतापर्यंत एकूण 67 लाख 53 हजार 666 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे रोजी 3908, 2 मे रोजी 3672, 3 मे रोजी 2662, 4 मे रोजी 2554, 5 मे रोजी 3879, 6 मे रोजी 3056, 7 मे रोजी 3039, 8 मे रोजी 2678, 9 मे रोजी 2403, 10 मे रोजी 1794, 11 मे रोजी 1717, 12 मे रोजी 2116, 13 मे रोजी 1946, 14 मे रोजी 1657, 15 मे रोजी 1447, 16 मे रोजी 1544, 17 मे रोजी 1240, 18 मे रोजी 953, 19 मे रोजी 1350, 20 मे रोजी 1425, 21 मे रोजी 1416, 22 मे रोजी 1299, 23 मे रोजी 1431, 24 मे रोजी 1057, 25 मे रोजी 1037, 26 मे रोजी 1362, 27 मे रोजी 1266, 28 मे रोजी 929, 29 मे रोजी 1048, 30 मे रोजी 1066, 31 मे रोजी 676, 1 जून ला 831, 2 जूनला 925, 3 जून ला 961, 4 जून ला 973, 5 जून ला 866, 6 जून ला 794, 7 जून ला 728, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 17 जून ला 666, 18 जून ला 762 नवे रुग्ण आढळून आले आहेत.