मुंबई -पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने आर्थिक अनियमितेमुळे निर्बंध आणले आहेत. यामुळे बँकेचे लाखो ग्राहक हवालदिल झाले आहेत. याच ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून मुंबई काँग्रेसच्या वतीने सायन येथील पीएमसी बँकेसमोर आज भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
मुंबई काँग्रेसचे पीएमसी बँकेबाहेर भीकमांगो आंदोलन - मुंबई काँग्रेसचे आंदोलन
पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेसमोर मुंबई काँग्रेसने आंदोलन केले. जर ग्राहकांना लवकरात लवकर त्यांचे पैसे परत न मिळाल्यास प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
![मुंबई काँग्रेसचे पीएमसी बँकेबाहेर भीकमांगो आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4600209-206-4600209-1569834912214.jpg)
पीएमसी बँकेबाहेर मुंबई काँग्रेसचे आंदोलन
पीएमसी बँकेबाहेर मुंबई काँग्रेसचे आंदोलन
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वात या बँकेसमोर आंदोलनामध्ये शेकडोंच्या संख्येत काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले होते. या ग्राहकांना लवकरात लवकर त्यांचे पैसे परत करावे, अशी मागणी चरणसिंग सप्रा यांनी केली आहे. या घोटाळ्या मागे भाजप-सेना असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. लवकरात लवकर पैसे परत न मिळाल्यास प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर त्याचबरोबर भाजप-सेनेचे आमदार खासदार मंत्री यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.