मुंबई- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे 'मिशन मुंबई' ( Congress Mission Mumbai ) सुरू आहे. यावेळी पहिल्यांदाच काँग्रेस नेते राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर 28 डिसेंबर रोजी ( Rahul Gandhi to be address on Shivthirth ) सभा घेणार आहेत. मात्र, राज्य सरकारने अद्याप परवानगी दिली नसल्याने अखेर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेच्या परवानगीसाठी आज सोमवार (दि.13) याचिका ( Bhai Jagtap Plea in high court ) दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या ( दि. 14) सुनावणी होणार आहे.
हेही वाचा-Mehagai Hatao Rally : आम्हाला हिंदुत्ववाद्यांना घालवून, हिंदूंचं राज्य आणायचंय - राहुल गांधी
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची शिवाजी पार्क येथील मैदानावर 28 डिसेंबर रोजी सभा होणार आहे. या सभेला अद्याप राज्य सरकारने परवानगी न दिल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेर आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी याचिका दाखल केली आहे. मंगळवारी खंडपीठसमोर सुनावणी आहे.
हेही वाचा-आम्ही आलो तर जमावबंदी, राहुल गांधी आले तर 144 लावाल का? : असदुद्दीन ओवैसी