महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या कार्यालकाळाचा मुंबई काँग्रेसकडून निषेध - मुंबई काँग्रेसचे आंदोलन

मोदी सरकारला सत्तेत येऊन आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबईमध्ये निदर्शने केली आहेत. 'सात वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास" अशी बॅनरबाजी सुद्धा यावेळेस मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली होती.

mumbai congress protest on modi government
mumbai congress protest on modi government

By

Published : May 30, 2021, 2:53 PM IST

Updated : May 30, 2021, 3:05 PM IST

मुंबई -मोदी सरकारला सत्तेत येऊन आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबईमध्ये निदर्शने केली आहेत. 'सात वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास" अशी बॅनरबाजी सुद्धा यावेळेस मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली.

मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या कार्यालकाळाचा मुंबई काँग्रेसकडून निषेध
मोदी सरकार हे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. गेल्या सात वर्षात मोदी सरकारने कोणत्याही विकासाचे काम केलेले नाही. कोरोनाच्या काळात ढिसाळ नियोजन केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केलेली आहे. तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सुद्धा केंद्र सरकारवर टीका केली आहे की, सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती. 15 लाख रुपये खात्यावर देऊ, काळा पैसा संपवू, महागाई कमी करू, बेरोजगारी दर कमी करू अशी अनेक आश्वासने दिली होती. पण आता पेट्रोल 100 रुपये पार गेले आहे. एलपीजी नऊशे वर गेला. खाद्यतेल 60 रुपये होते ते आता दोनशेवर गेले आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय देश माझा, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर केलेली आहे.
Last Updated : May 30, 2021, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details