महाराष्ट्र

maharashtra

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प डिसेम्बर २०२३ पूर्ण होईल, प्रकल्पाला भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By

Published : Sep 19, 2022, 6:47 PM IST

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प डिसेंबर २०२३ पूर्ण होईल (Coastal Road Project will complete December 2023). ह्यामुळे लाखो लोकांना दिलास मिळेल. लोकांना लवकर हा प्रकल्प वापरायला मिळेल, अशी माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली (CM assured today). ते कोस्टल रोड प्रकल्प पाहणी करताना बोलत होते.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प डिसेम्बर २०२३ पूर्ण होईल
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प डिसेम्बर २०२३ पूर्ण होईल

मुंबई -मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत महत्त्वाची भूमिका हा प्रकल्प निभावणार आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प डिसेंबर २०२३ पूर्ण होईल (Coastal Road Project will complete December 2023). ह्यामुळे लाखो लोकांना दिलास मिळेल. लोकांना लवकर हा प्रकल्प वापरायला मिळेल, अशी माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते कोस्टल रोड प्रकल्प पाहणी करताना बोलत होते (CM assured today).

प्रकल्पाचे 53 टक्के काम पूर्ण -मागच्या वर्षीच पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस ट्रिक ते वरळी सी पर्यंत 10.58 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. सध्या त्यातील काही काम अपूर्ण आहे. या प्रकल्पाचे 53 टक्के काम पूर्ण झालेले आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे 180 मीटरपेक्षा अधिक काम नुकतेच पूर्ण झाले. पुढीलवर्षी अर्थात 2023 मध्ये बोगदा खणण्याचे काम महापालिकेने उद्दिष्टे मध्ये नक्की केलेले आहे. त्याची पाहणी आज करतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही ग्वाही दिली. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाला भेट देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले, ती केवळ शिल्लक सेना असल्याची टीका यावेळी फडणवीस यांनी केली.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प

बोगदा खणण्याचे काम 2022 मध्ये पूर्ण -सागरी किनारी रस्ता प्रकल्प या अंतर्गत निश्चित मार्ग ते वरळी वांद्रे सागरी सेतूपर्यंत पालिकेच्यातर्फे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येणार आहे. या अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटी या दरम्यान दोन किलोमीटर अंतराचे दोन बोगदे दोन्ही बाजूने बांधले जाणार आहे. त्यापैकी मरीन ड्राईव्ह कडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या पहिला बोगदा खणण्याचे काम 2022 मध्ये पूर्ण झाले आहे.

संपूर्ण कामाचा आढावा -दुसऱ्या बोगद्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. या संपूर्ण कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज या प्रकल्पाच्या कार्यस्थळी भेट दिली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जोडीने या प्रकल्पाला भेट दिल्यामुळे याची चर्चा तर होणारच. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ह्या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिंदे फडणवीस शासनाचे असणार आहे. त्यामुळेच सद्य स्थितीत काम कुठेपर्यंत आलेले आहे. त्याचा आढावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आज घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details