मुंबई -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा श्रीधर पाटणकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे ( Shridhar Patankar relief ). सीबीआयकडून श्रीधर पाटणकर यांच्या विरोधातील तपास बंद करण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दिली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या विरोधात युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, ज्वेलर्स आणि सराफा ट्रेडिंग कंपनी पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यांच्या विरोधात 84.6 कोटी रुपयांच्या फसवणूक आणि बनावट खटल्याचा प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाने मंजूर केला आहे.
अहवालात सबळ पुरावे -सीबीआयने दाखल केलेल्या अहवालात सबळ पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी न्यायालयाने ऑक्टोबर 2020 मध्ये सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला होता. विशेष म्हणजे या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध आहे. ईडीने या प्रकरणा पुष्पक बुलियन या कंपनीच्या चंद्रकांत पटेल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. मार्च महिन्यात ईडीने याच प्रकरणात पाटणकर यांच्या कंपनीच्या 6.5 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली होती.
उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर -ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या कंपनीची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. अंमलबजावणी संचालनालयाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा ( PMLA ) अंतर्गत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 निवासी सदनिका जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी केला होता. याप्रकरणी भाजपचे नेत किरीट सोमय्या यांनी जोरदार आवाज उठवला होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांना याचा हिशोब द्यावा लागेल असे म्हटले होते.
राजकीय दबावाचा आरोप - ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ श्रीधर माधव पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि व्यवस्थापक आहेत ईडीच्या आरोप पत्रात म्हटले होते. श्रीधर पाटणकर हे केवळ उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित नाहीत तर ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. राजकीय दबाव आणि खळबळ माजवण्याचे हे कृत्य आहे. त्यांना केंद्रीय एजन्सींच्या माध्यमातून हे दाखवायचे आहे की आम्ही दबावाला घाबरु शकतो पण आम्ही कोणत्याही किंमतीला ते होऊ देणार नाही. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये हे घडत आहे. ही हुकूमशाहीची सुरुवात आहे. आम्ही सर्व तुरुंगात जाण्यास तयार आहोत, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिले होते.
काय आहे प्रकरण? - श्रीधर पाटणकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असून या कंपनीच्या मालकीच्या 11 सदनिका जप्त करण्यात आल्यात. हमसफर डिलरनं पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी कर्ज दिले होते. मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचं ईडीचा आरोप आहे. नंदकिशोर चर्तुवेदी यांची हमसफर कंपनी आहे. त्यांच्याकडून पाटणकरांच्या कंपनीनं विनातारण कर्ज घेतले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी पाटणकरांच्या कंपनीत पैसे दिले. या पैशातूनच ठाण्यात निलांबरी प्रोजेक्टचं बांधकाम करण्यात आले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. 2017 त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रानंतर आता भाजपचे पुढचे टार्गेट ठरले.. 'या' राज्यात सत्ता आणण्यासाठी तयारी.. मोदींचा आज दौरा