मुंबई - अभिनेता रजत बेदी विरोधात डीएन नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान ज्या पादचाऱ्याला धडक दिली होती त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री रजत बेदीच्या गाडीने एका व्यक्तीला धडक दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी बेदीवर कलम २७९ आणि ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी तपास करीत आहे. आता मृत्यू झाल्यामुळे या कलामांमध्ये बदल होऊ शकतो.
अभिनेता रजत बेदीच्या कारने धडक दिलेल्या पादचाऱ्याचा मृत्यू
अभिनेता रजत बेदी विरोधात डीएन नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी रात्री रजत बेदीच्या गाडीने एका व्यक्तीला टक्कर दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. उपचारादरम्यान या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे रजत बेदीच्या अडचणीत भर पडली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करीत आहे.
डीएन नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी मिलिंद कुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता रजत बेदी स्वतः कार चालवत होता. रस्ता पार करत असलेले राजेश धूत यांना त्याच्या कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर रजत बेदीने स्वतः धूत यांना जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे धूत यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती देण्यात आली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र रजत बेदी तिथून निघून गेला होता.
उपचारादरम्यान या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे रजत बेदीच्या अडचणीत भर पडली आहे.