मुंबई -मुंबई उच्च न्यायालयात कोरोना संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी झाली. यामध्ये खासगी लसीकरण केंद्रावर सुरू असलेल्या गोंधळाचा आणि बोगस लसीकरणाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणी राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा अहवाल आज हायकोर्टात सादर केला गेला. यावेळी बनावट लसीकरणाला बळी पडलेल्यांचा विचार करा, तसेच बोगस लसीकरण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
2053 नागरिकांची फसवणूक
मुंबई पोलिसांनी कांदिवली-बोरीवली परिसरात विविध कलमांखाली या रॅकेटविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. काही आरोपींच्यावतीने दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेत, तर काहींचे अद्याप प्रलंबित आहेत. मात्र कुणालाही अटकपूर्व जामीन अर्ज अद्याप दिलेला नाही, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचेही राज्य सरकारने हायकोर्टात सांगितले.
आतापर्यंत 400 साक्षीदारांचे नोंदवले जबाब