मुंबई - भांडुप एलबीएस रोड येथील ड्रीम्स मॉलला काल संध्याकाळी 7.56 मिनिटांनी भीषण आग ( Bhandup Dream Mall Fire ) लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल 9 तासांनी म्हणजेच सकाळी 9.46 वाजता ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या मॉलला वर्षभरात पुन्हा आग लागल्याचे समोर आले आहे. याआधी लागलेल्या आगीत मॉलमधील सनराईज हॉस्पिटलमधील 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
ड्रीम्स मॉलला दुसऱ्यांदा आग
भांडुप एलबीएस रोड येथील ड्रीम्स मॉलला आज संध्याकाळी 7.56 वाजता भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच महापालिका अधिकारी दाखल झाले आहेत. रात्री उशिरा ही आग लेव्हल 4 ची असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 15 फायर इंजिन, 11 जंबो टँकरद्वारे 9 तास झुंज दिल्यावर पहाटे 4.56 वाजता आग विझवण्यात यश आले आहे. आग विझवण्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाहूर स्टेशन आणि भांडुप कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या आगीच्या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. मागील वर्षी 26 मार्चला या मॉलला आग लागली होती. त्यानंतर गेले वर्षभर हा मॉल बंद असल्याची माहिती मिळत आहे.