मुंबई -मुंबईकरांची लाईफलाईन असलेला बेस्ट उपक्रम ( Mumbai Best Bus ) डिजिटल होत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच चलो ॲपचे ( Chalo App By BEST ) लोकार्पण करण्यात आले. बेस्टमध्ये गेल्या काही महिन्यात प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, आता चलो ॲपवरुन वाहकाला पैसे दिल्यास मोबाईलवरच तिकिट दिसणार आहे. तसेच पास दाखवल्यावर ही मोबाईलवर तिकीट दिसणार आहे. यामुळे गर्दीच्यावेळी कंडक्टर आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कागदी तिकीट होणार बंद -
मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाद्वारे परिवहन सेवा दिली जाते. दोन वर्षापूर्वी कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यावर रेल्वे सेवा बंद करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्टने केले. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर सामान्य प्रवाशांना बेस्टने प्रवास करण्याची मुभा दिल्यावर प्रवाशांची संख्या वाढली. प्रवाशांची संख्या वाढू लागताच बेस्टने चलो ॲप सुरु केले. या ॲपला सलग्न असलेल्या मोबाईल वॉलेटमधून अथवा कार्डमधून पैसे अदा करुन तिकीट घेता येते. आतापर्यंत हे तिकीट दाखवल्यावर प्रवाशांच्या विनंतीवर वाहक प्रवाशांना कागदी तिकीट देत होते. त्याच बरोबर या ॲपलिकेशनबरोबर पासही जोडला असणार आहे. हा पास दाखवल्यावर वाहकांकडून शून्य रुपयांचे तिकीट दिले जात होते. मात्र, १४ फेब्रुवारीपासून ही पध्दत बंद होणार असून ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे कागदी तिकीट देणे बंद करण्यात येणार आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून कळविण्यात आले आहे.
पेपरलेस तिकीट -