महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Money Laundering Case सुधाकर शेट्टी सीबीआयच्या रडारावर; अटकेची टांगती तलवार कायम - builder Sudhakar Shetty

मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुधाकर शेट्टी ( Builder Sudhakar Shetty ) केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.35 हजार कोटींच्या या रॅकेटमध्ये सीबीआयचने शेट्टी यांच्या चौकशीचा फास आवळला आहे.

Money Laundering Case
मनी लाँड्रिंग प्रकरण

By

Published : Aug 11, 2022, 9:50 PM IST

Updated : Aug 11, 2022, 10:32 PM IST

मुंबई : मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुधाकर शेट्टी ( Builder Sudhakar Shetty ) केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. 35 हजार कोटींच्या या रॅकेटमध्ये सीबीआयचने शेट्टी यांच्या चौकशीचा फास आवळला आहे. याआधी सीबीआयने ( CBI ) डीएचएफएलचे माजी प्रवर्तक कपिल वाधवन ( Kapil Wadhawan ) , त्याचा भाऊ धीरज, सहाना ग्रुपचे चेअरमन सुधाकर शेट्टी आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध 34 हजार 615 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

संजय छाब्रिया यांचे स्पष्टिकरण- रेडियस ग्रुपचे अध्यक्ष संजय छाब्रिया ( Sanjay Chhabria, Chairman, Radius Group ) यांनी जबाबात स्पष्टीकरण दिले. दोन वर्षांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate ) केलेल्या तपासातही सुधार शेट्टी यांचे नाव पुढे आले होते. फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ( Underworld don Dawood Ibrahim ) जवळचा साथीदार असलेल्या इक्बाल मिर्चीसह हवाला ऑपरेटिंग घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या ( Gangster Iqbal Mirchi ) मनी लाँड्रिंग प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत आहे. सीबीआयने मुंबईतील उद्योगपती सुधाकर शेट्टी यांच्याशी संबंधित काही कंपन्यांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स (DHFL) मधून निधी वळवण्यास कशी मदत केली याची माहिती देणारी कागदपत्रेही उघड केली आहेत. रेडियस ग्रुपचे अध्यक्ष संजय छाब्रिया यांनीही शेट्टी यांनी दिवाणच्या सांगण्यावरून कोट्यवधींचा निधी कसा हडप केला याचे स्पष्टीकरण त्यांच्या जबाबात दिले आहे.


बारडान्सर तरन्नुमच्या बंगल्यावर छापा : प्रसिद्ध डान्स बारमध्ये क्रिकेट बुकी, बॉलीवूड सेलिब्रिटी, अंडरवर्ल्ड ऑपरेटर्स वारंवार येत असत आणि त्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेली कोट्याधीश मालमत्ता असलेली बार डान्सर तरन्नुम.कधी कधी एका रात्रीत ९० लाख कमवणारी ही तरन्नुम दीपा बारमध्ये डान्सर म्हणून काम करायची. तरन्नुमच्या बंगल्यावर छापा टाकून आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात बेहिशेबी पैसे आणि दागिने जप्त केले आहेत. क्रिकेट बुकींशी असलेल्या तिच्या कथित संबंधांबद्दल मुंबई पोलिसांनी तरन्नुमचीही चौकशी केली होती. आयकर विभागाच्या छाप्यानंतर दीपा बारचे मालक असलेल्या सुधाकर शेट्टी यांची सुद्धा तासन्तास चौकशी झाली होती.

कंसोर्टिया बँकांना 42,871 कोटी रुपयांची मोठी कर्ज मंजूर : एफआयआरनुसार, दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, त्याचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवन, तत्कालीन संचालक धीरज वाधवन, बांधकाम व्यावसायिक सुधाकर शेट्टी आणि इतर आरोपींनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कटाचा एक भाग म्हणून आरोपी कपिल वाधवन आणि इतरांनी कंसोर्टिया बँकांना 42,871 कोटी रुपयांची मोठी कर्ज मंजूर करण्यास प्रवृत्त केले.

सीबीआयने यांना केले आरोपी :सीबीआयने दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल), कपिल वाधवान, धीरज वाधवन, स्कायलार्क बिल्डकॉन प्रा. लि., दर्शन डेव्हलपर्स प्रा. लि., सिगतिया कन्स्ट्रक्शन बिल्डर्स प्रा. लि., टाउनशिप डेव्हलपर्स प्रा. लि., शिशिर रिअॅलिटी प्रा. लि., सनब्लिंक रिअल इस्टेट प्रा. लि., सुधाकर शेट्टी आदींना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. सर्व आरोपींविरुद्ध फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2010 पासून कंपन्यांना कर्ज दिले : बँकांनी आरोपी कंपन्यांना २०१० पासून कर्ज देण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये, 34,615 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज अनुत्पादित मालमत्ता (NPA - नॉट परफॉर्मिंग असेट्स) म्हणून घोषित करण्यात आली.

हेही वाचा -अश्लील व्हिडिओ बनवून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

Last Updated : Aug 11, 2022, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details