मुंबई - एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी खांदापालट करायला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसेना उपनेतेपदी अर्जुन खोतकर ( Arjun khotkar as shiv sena deputy leader ) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर पक्ष कारवाया केल्याप्रकरणी विजय नाहटा, विजय चौगुले या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ( Shiv Sena Central Office ) देण्यात आली.
शिवसेना प्रभारी संपर्कप्रमुख जाहीर -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते आणि संभाजीनगर, जालना जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील मीरा- भाईंदर क्षेत्राच्या प्रभारी संपर्क प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.