महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai APMC Market : सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; भाजीपाल्याचे दर कडाडले

Mumbai APMC Market : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला पावसामुळे शेतमालाची आवक प्रभावित झाली असून, सामान्य परिस्थितीच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने सध्या भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पालेभाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. ( Vegetable Price Hike ) त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे.

Mumbai APMC Market
Mumbai APMC Market

By

Published : Aug 4, 2022, 7:30 AM IST

नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीरच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे ज्वाला मिरचीच्या दरात सातशे तर लवंगी मिरचीच्या दरात सहाशे रुपयांनी वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात दीड ते 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे. शिराळे दोडक्याच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगांच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. लिंबूच्या दरात 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. एकंदरीतच सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे दर कडाडलेले पाहायला मिळाले. श्रावण महिन्यात बहुसंख्य लोक हे शाकाहारी खाण्यावर भर देत असल्यामुळे हे दर चढे पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४०० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६००० ते ७००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २४०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे ६३०० ते ७००० रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २६०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४८०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४८०० रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४४०० ते ४८०० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते १८०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ११,५०० ते १४००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५५०० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४२०० रुपये

पालेभाज्या -

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २२०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २२०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २२०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २२०० ते २६०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० ते ९०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० ते १२०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ६०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६०० रुपये

हेही वाचा -Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात आज दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

हेही वाचा -Bit Coin Rate In India : बिटकॉईनच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details