महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई अमली पदार्थ विरोधी पोलिसांची मागील 3 वर्षात 131 कोटींचा 3414 किलो मुद्देमाल जप्त - Mumbai Drugs Case

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 3 वर्षात 131 कोटींचा 3414 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2019 आणि सन 2020च्या तुलनेत सन 2021 मध्ये अमली पदार्थ विरोधी कक्ष अधिक सक्रिय झाला असून 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत कारवाई 7 पटीने वाढवली आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

Mumbai Anti-Narcotics Police seized 3414 kg of goods worth Rs 131 crore in the last 3 years
मुंबई अमली पदार्थ विरोधी पोलिसांची मागील 3 वर्षात 131 कोटींचा 3414 किलो मुद्देमाल जप्त

By

Published : Nov 4, 2021, 3:56 PM IST

मुंबई - शहर अमली पदार्थांची राजधानी तर बनत नाही चालली ना? असा प्रश्न यासाठी उपस्थित होत आहे कारण मागील 3 वर्षात मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईत 208 गुन्हे दाखल केले असून यात 298 आरोपींना अटक केली आहे. मागील 3 वर्षात 131 कोटींचा 3414 किलो मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे. मागील 3 वर्षात यावर्षी कारवाईत 7 पटीने वाढ झाली आहे.

अनिल गलगली यांची प्रतिक्रिया

सर्वाधिक मुद्देमाल 2021 मध्ये जप्त -

सन 2019 आणि सन 2020च्या तुलनेत सन 2021 मध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष अधिक सक्रिय झाला असून 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत कारवाई 7 पटीने वाढली आहे. सन 2019 मध्ये 394.35 किलो मुद्देमाल जप्त केला असून यात 1343 स्ट्रीप्स, 7577 बॉटल्स आणि 1551 डॉट मिली ग्राम आहे. याची एकूण किंमत 25.29 कोटी इतकी आहे. सन 2020 मध्ये 427.277, किलो मुद्देमाल जप्त केला असून यात 5191 बॉटल्स, 66000 टॅब 14 डॉट मिली ग्राम आहे. याची एकूण किंमत 22.24 कोटी इतकी आहे. तर 20 ऑक्टोबर 2021 च्या वर्षी 2592.93 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि 15830 बॉटल्स व 189 एलएसडी पेपर्स सुद्धा आहे ज्याची किंमत 83.19 कोटी इतकी आहे.

सर्वाधिक गुन्हे आणि अटक आरोपी 2021मध्ये -

अमली पदार्थ विरोधी कक्षाने सन 2019 आणि सन 2020 च्या तुलनेत सन 2021 मध्ये सर्वाधिक गुन्हे नोंद तर केलेच तसेच अटक आरोपी सुद्धा सर्वाधिक होते. 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 94 गुन्हे नोंद झाले ज्यात अटक आरोपींची संख्या 137 आहे. सन 2019 मध्ये 70 गुन्ह्यात 103 आरोपींना अटक करण्यात आली तर सन 2020 मध्ये फक्त 44 गुन्ह्याची नोंद झाली ज्यात आरोपी अटक संख्या 58 होती.

जनजागृती आणि धडक कारवाईची अपेक्षा -

अनिल गलगली यांच्या मते या कारवाईत अजून भर पडू शकते यासाठी स्थानिक पातळीवर गुन्ह्यात वाढ झाली तर त्या पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. कारण अंमली पदार्थ विरोधी कक्षाला माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कारवाईत वेळ जातो आणि काही वेळा आरोपी फरार होतात. यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि धडक कारवाईची अपेक्षा आहे.

हेही वाचा -शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या बेनामी 27 कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू

हेही वाचा -शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचे सीसीटीव्ही फूटेज मुंबई पोलिसांच्या हाती

ABOUT THE AUTHOR

...view details