महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई अमली पदार्थविरोधी पथक NCB पेक्षा सरस! - एनसीबीची कारवाई

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात आलेली कारवाई एनसीबीच्या कारवाई पेक्षा सरस असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत 87 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे, तर मागील 3 वर्षांत 182 कोटींचे ड्रग्ज पकडले आहे.

मुंबई अमली पदार्थविरोधी पथक NCB पेक्षा सरस!
मुंबई अमली पदार्थविरोधी पथक NCB पेक्षा सरस!

By

Published : Nov 5, 2021, 5:17 PM IST

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेली मुंबई ही अंमली पदार्थांची राजधानी तर बनत नाही चालली ना? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबईतील ड्रग्ससंबंधी मोठी कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB कडून करण्यात आली होती. यामध्ये बॉलीवूड मधील अनेक नामवंत अभिनेत्रींचे देखील समावेश होता. मात्र मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात आलेली कारवाई एनसीबीच्या कारवाई पेक्षा सरस असल्याची माहिती समोर येत आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनची चांगलीच चर्चा झाली. मात्र मुंबई एनसीबीकडून करण्यात आलेली कारवाई मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या तुलनेत कमी आहे. मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत 87 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे, तर मागील 3 वर्षांत
182 कोटींचे ड्रग्ज पकडले आहे.

मुंबई एनसीबीकडून एका वर्षात 150 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये एकूण 114 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात 34 विदेशी नागरिक होते. तर बॉलिवूड सहीत इतर 300 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता एकदा पुन्हा एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारवाईदरम्यान 100 किलो पेक्षा अधिक कोकेन ड्रग्स, 30 किलो चरस, 12 किलो हेरोइन, 2 किलो कोकेन, 350 किलो गांजा, 60 किलो इफेड्रिन आणि 25 किलो एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून एका बाजूला बॉलीवूड आणि सेलिब्रीटी यांची धरपकड सुरू असताना, दुसरीकडे पोलिसांनी मुंबईची ड्रगसफाई सुरु केली आहे. मुंबई पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने चालू वर्षात पहिल्या आठ महिन्यांत तब्बल तीन हजार ५७५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ८७ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. अमली पदार्थ तस्करीची साखळी तोडण्यासाठी ड्रग्ज पुरवठादारांपासून ते व्यसन करण्यापर्यंत सर्व पातळीवरील आरोपींना पकडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

मुंबई पोलीसांची तीन वर्षांतील आकडेवारी

वर्ष गुन्हे आरोपी ड्रग्ज किंमत
२०१९ ५१४ ५९५ ७१६ किलो ६७ कोटी १४ लाख
२०२० ४१४ ४८० १०२३ किलो २८ कोटी ५९ लाख
२०२१ ४४३ ५५७ ३८३५ किलो ८६ कोटी ७१ लाख


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान देशातील मोठं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. या ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली होती. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दिपीका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंहची NCB कडून करण्यात आली होती. आता देखील NCB कडून क्रूज ड्रग्ज प्रकरणात पुन्हा एकदा बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणी तुरुंगवासातही गेला होता. तर अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरू आहे. NCB कडून प्रकरणात चौकशी सुरू आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण यानंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेकांची चौकशी सुरू आहे. ती आजतागायत सुरूच आहे. फक्त बदलले चेहरे आणि नावे. मात्र आता ही कारवाई पुढे जात आणखी किती जणांचे नाव समोर येतात हे पाहावे लागणार आहे.


ड्रग्स प्रकरणात या कलाकारांची झाली होती चौकशी
रिया चक्रवर्ती, ममता कुलकर्णी, संजय दत्त, फरदीन खान, प्रतीक बब्बर, अरमान कोहली, श्रद्धा कपूर, सारा अली खान, आर्यन खान, भारती सिंह (कॉमेडी ऍक्टर्स)

ABOUT THE AUTHOR

...view details