महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bullet Train : सत्ताबदलानंतर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन काम वेगाने; पहिला ट्रेन 2026 मध्ये धावणार - शिंदे सरकार आणि बुलेट ट्रेन

राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन ली. ( National High Speed Rail Corporation Ltd. ) नवी दिल्ली मुख्य जनसंपर्क अधिकारी सुषमा गौर यांना विचारले असता त्यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, 2026 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार ( first Bullet train will run in 2026 ) आहे. महाराष्ट्रातील कामाला परवानगी मिळाल्याने आता काम मोठ्या जोमाने सुरु आहे.

Mumbai Ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

By

Published : Jul 20, 2022, 7:28 PM IST

मुंबई - राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान होताच बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ( Mumbai Ahmedabad bullet train ) बाबत पुन्हा चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्व अनुमती देखील दिल्याचे नुकतेच जाहीर केले. या संदर्भात राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन ली. नवी दिल्ली मुख्य जनसंपर्क अधिकारी सुषमा गौर यांना विचारले असता त्यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, 2026 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार ( first Bullet train will run in 2026 ) आहे. महाराष्ट्रातील कामाला परवानगी मिळाल्याने आता काम मोठ्या जोमाने सुरु आहे. मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरची एकूण लांबी 508.17 किमी आहे. तर बुलेट ट्रेनचा कमाल ऑपरेशनल स्पीड 320 किमी प्रतितास असा असणार आहे. त्यासाठी सुसज्ज तसा मार्ग तयार करण्याचे काम वेगाने हाती घेतले आहे.

राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन ली. ने बनवलेला व्हिडिओ

बुलेट ट्रेन प्रवासात किती स्थानक असणार ?पुढे सुषमा गौर यांनी सांगितले, 'मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रवासात एकूण स्थानकांची संख्या १२ असणार आहे तर त्यापैकी गुजरातमध्ये ८ वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती स्थानके तर महाराष्ट्रात मुंबई (BKC), ठाणे, विरार आणि बोईसर ४ रेल्वे स्थानके असणार आहेत. या संपूर्ण प्रवासाचे कॉन्ट्रोल साबरमती येथून केले जाणार आहे. त्याला ऑपरेशनल कंट्रोल सेंटर असे म्हटले जाईल.'

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने

भूसंपादनाची स्थिती - भूसंपादनाची स्थिती नेमकी काय आहे या संदर्भात सुषमा गौर म्हणाल्या, ''भूसंपादनाची स्थिती म्हणाल तर गुजरातमध्ये आधीच 98.81% जमीन अधिग्रहित झाली आहे. तर दादरा नगर हवेली येथील जमिनीचे 100% अधिग्रहण झाले आहे. तर महाराष्ट्र राज्यात एकूण 433.82 हेक्टर जमीन आवश्यक आहे, त्यापैकी भौतिक ताबा 39% म्हणजेच 168 हेक्टर क्षेत्र प्राप्त झाले आहे. तथापि, नियमित निवाडा प्रक्रिया सुरू आहे. त्यात अनेक दावे आहेत. एकूण ४३३. हेक्तर पैकी आजपर्यंत 72.25% जमीन संपादित करण्यात आली आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने

२०२६ पासून पहिली बुलेट ट्रेन धावणार -180 किमी लांबीच्या कॅप्सचे काम प्रगतीपथावर असून पैकी 75.1 किमी पिअरचे काम पूर्ण झाले आहे. वापी ते साबरमती, सुरत आणि सर्व 8 हायस्पीड रेल्वे स्टेशनवरील काम साबरमती डेपोच्या अंतर्गत सुरु आहे. ७५ किलो मीटर पर्यंत मार्गावरील रूट पिलर टाकून झालेले आहेत. तर अहमदाबाद ते वापी यामधील १६० किलो मीटर अंतरावर रेल्वे मार्गाचे फाउंडेशनचे काम केले गेले आहे. सूरत ते बिल्मोरा स्टेशन पर्यंत पहली बुलेट ट्रेन 2026 पर्यंत सुरु होणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी सुषमा गौर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गेल्या नंतर केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने होणार अशी चर्चा आहे.

हेही वाचा -Vrushali Gajbhiye Amravati : कॅन्सरग्रस्तांच्या सन्मानासाठी वृषालीने केले केसदान; दिला सामाजिक संदेश

ABOUT THE AUTHOR

...view details