मुंबई -एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच एसी लोकलचे तिकीट दर 50 टक्यांनी कमी होणार ( Mumbai AC Local Train ) आहे. याबाबत अधिकृत घोषणा स्वतः आज ( 29 एप्रिल ) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister Raosaheb Danve ) यांनी केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १९ फेब्रुवारी २०२२ पासून ३४ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहे. सध्या मध्य रेल्वेवर ६० एसी लोकल फेऱ्या धावत आहे. मात्र, या वातानुकूलित लोकलचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने या एसी लोकल प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. नॉन एसी लोकलच्या फेऱ्या रद्द करून एसी लोकल प्रवाशांवर लादल्या आहे. या एसी लोकलचे तिकिट काढणे प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे एसी लोकलचे तिकिट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली गेली होती. प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेत, रेल्वे मंत्रालयाने मुंबई उपनगरात धावणार्या वातानुकूलित येथील लोकलचे तिकीट दर तब्बल पन्नास टक्क्याने कमी केल्याची माहिती स्वतः रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
रावसाहेब दानवे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाडे कपातीच्या प्रस्तावाला मंजुरी -भायखळा स्थानकाच्या हेरिटेज जीर्णोद्धाराचे लोकार्पण कार्यक्रमात रावसाहेब दानवे बोलत होते. दानवे यांनी सांगितले की, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मी स्वतः सर्वसामान्य लोकल ट्रेनचा डब्यातून प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान आम्ही प्रवाशांची चर्चा केली होती. त्यावर प्रवाशांनी समाधान सुद्धा व्यक्त केले होते. मात्र, उन्हाळ्यात एसी लोकलमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा मिळावी. याकरिता एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी आमच्याकडे प्रवाशांनी केली होती. त्यानंतर आम्ही एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहेत. कालच ( 28 एप्रिल ) भाडे कपातीच्या प्रस्तावावर अश्विन वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच तिकीट दर कपातीची अंमलबजावणी होणार आहे.
स्थानकजुने आणि नवीन दर
- सीएसएमटी ते दादर - ६५ रुपये - ३० रुपये
- सीएसएमटी ते ठाणे - १८० रुपये - ९० रुपये
- सीएसएमटी ते कल्याण - २१० रुपये - १०५ रुपये
- सीएसएमटी ते टिटवाळा - २२० रुपये - ११० रुपये
- सीएसएमटी ते अंबरनाथ - २०५ रुपये - १०० रुपये
- चर्चगेट ते बोरिवली- १८० रुपये - ९० रुपये
- चर्चगेट ते विरार - २२० रुपये - ११० रुपये
हेही वाचा -Bail Granted To Jignesh Mevani : काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना जामीन मंजूर