मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून देशभरात १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात ( Mumbai 12 to 14 years Boys Vaccination ) झाली. मुंबईमध्येही आजपासून या वयोगटातील लसीकरण सुरु ( 12 to 14 Years Boys Vaccination Started ) झाले. १२ केंद्रांपैकी काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले तर राजावाडी सारख्या रुग्णालयात लसीकरण उशिरा सुरु झाले आहे. यामुळे दिड ते दोन तास लसीकरणासाठी आलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना ताटकळत राहावे लागले.
१२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण -
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी, २०२१ पासून कोरोना आजारासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेत सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षांवरील वयोवृद्ध, ४५ वर्षांवरील आजार असलेले नागरिक, त्यानंतर १ मे, २०२१ पासून १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे आणि ३ जानेवारी, २०२२ पासून १५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. याचाच पुढील भाग म्हणून आजपासून १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे १२ केंद्रांवर कोरोना लसीकरण करण्याचे महापालिकेने घोषित केले.