महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किल्ले लग्न, समारंभांसाठी भाड्याने देण्याच्या बातमीवर पर्यटन विभागाचा खुलासा - किल्ले भाडे तत्वावर

गडकिल्ल्यांसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयावरुन सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले आहे. किल्ले भाडे तत्वावर देण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. याबाबत गोंधळ वाढू नये यासाठी पर्यटन विभागाने एक पत्रक काढून खुलासा केला आहे.

पर्यटन विभागाचा खुलासा

By

Published : Sep 6, 2019, 2:24 PM IST

पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी प्रसिध्द केलेले निवेदन पुढील प्रमाणे...

राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.
वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे. त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.

मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये.

विनीता सिंगल

सचिव, पर्यटन

ABOUT THE AUTHOR

...view details