महाराष्ट्र सरकारने पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गडकिल्यांच्या जमिनी पर्यटन महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
जाणून घ्या, गडकिल्ल्यांच्या जमिनी बिल्डरांना देण्याचा निर्णय नेमका काय आहे ?
गडकिल्ल्यांच्या जमिनी खासगी विकासकांना देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय. मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावरुन सध्या राजकारण तापले आहे. हा नेमका निर्णय काय आहे याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
निर्णय नेमका काय आहे ?
या नवीन धोरणानुसार महामंडळाला मिळणाऱ्या सर्व जमिनी आता वर्ग -२ प्रवर्गात मिळतील. यानुसार वर्ग- २ चे किल्ले खासगी विकासकांना भाडेतत्वावर देण्यात येतील. ३० + ३० +३० वर्षे किंवा ६० + ३० वर्षे कालावधीसाठी एमटीडीसी भाड्याने जमिनी देऊ शकेल. यासंबंधी जमिनींबाबत नव्याने धोरण ठरवण्यात आले. दि. ३ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत हा निर्णय पार पडलाय. हा शासन निर्णय पुढील प्रमाणे...
Last Updated : Sep 6, 2019, 7:20 PM IST