मुंबई - शिवसेना-भाजपची युती झाल्यावर शिवसेनेला सर्वच स्तरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात बॅनरच्या माध्यमातून शीतयुद्ध सुरू असताना त्यात मनसेने उडी मारली आहे. शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी, देशप्रेमासाठी’ नाही तर ‘ही युती राजकीय स्वार्थासाठी, सत्ताप्रेमासाठी’ असे बॅनर मनसेच्यावतीने लावण्यात आले आहे.
शिवसेना-भाजप युती 'स्वार्थासाठी’, 'सत्ताप्रेमासाठी’, मनसेची बॅनरमधून टीका - banner
शिवसेना भवनाबाहेर हिंदुत्वासाठी युती असे पोस्टर लावले होते. युतीच्या बॅनरची खिल्ली उडवण्यासाठी मनसेनेही बॅनर लावले.
बॅनर
मनसेच्या अखिल चित्रे यांनी मातोश्रीबाहेर कलानगर परिसरात बॅनल लावला आहे. भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वासाठी नाही, तर सत्तेसाठी झाली आहे. वाघाची सिंहाला मिठी अशा आशयाचा बॅनर आहे. २ दिवसांपूर्वीच भाजप आणि सेनेची युती झाली. त्यानंतर शिवसेना भवनाबाहेर ही हिंदुत्वासाठी युती असे पोस्टर लावले होते. युतीच्या बॅनरची खिल्ली उडवण्यासाठी ही युती हिंदुत्वाची नसून सत्तेसाठी असल्याचे बॅनर मनसेने लावले.