महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महावितरणकडून 12 लाख शेतकऱ्यांचे वीज बिल माफ! - महावितरणकडून शेतकऱ्यांचे वीज बिल माफ

एरवी वीज बिलांंतून शॉक देणाऱ्या महावितरणने सुमारे १२ लाख शेतकऱ्यांची २६४४ लाख रुपयांची कृषी पंप वीज बिले माफ केली आहेत. शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी आर्थिक संटकात असल्याने किमान चालू बिले भरावी, असे आवाहन महावितरण विभागाने केले आहे.

महावितरणकडून 12 लाख शेतकऱ्यांचे वीज बिल माफ!
महावितरणकडून 12 लाख शेतकऱ्यांचे वीज बिल माफ!

By

Published : Nov 16, 2021, 6:24 PM IST

मुंबई : एरवी वीज बिलांंतून शॉक देणाऱ्या महावितरणने सुमारे १२ लाख शेतकऱ्यांची २६४४ लाख रुपयांची कृषी पंप वीज बिले माफ केली आहेत. शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी आर्थिक संटकात असल्याने किमान चालू बिले भरावी, असे आवाहन महावितरण विभागाने केले आहे.

जवळपास १२ लाख शेतकरी वीज बिल मुक्त
आर्थिक मंदीचा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्याला कोरोनाचा सामना करावा लागला. कोरोना संकटामुळे राज्याची झोळी रिकामी झाली. अनेक व्यवहार ठप्प झाल्याने राज्यातील शेतकरीही हवालदिल झाले. वीज बिलांच्या थकबाकी बरोबरच कृषी पंप वीज जोडणी धोरणातील कृषी पंप वीज बिलांची थकबाकी वाढली. या अंतर्गत सुमारे ६६ टक्के सूट दिली जाते. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील १२ लाख ५० हजार ६८५ शेतकऱ्यांकडे १० हजार ८४१ कोटींची मूळ थकबाकी होती. त्यातील २६४४ कोटी ७७ लाख रुपये महावितरणकडून माफ केले. तसेच वीज बिलात सवलत देत, विलंब आकार आणि व्याजातील सूट माफ केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे १ लाख ८० हजार ५२२ शेतकरी वीज बिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाल्याचा महावितरण विभागाचा दावा आहे. तर पुणे परिमंडलातील १३ हजार ७५४ शेतकरी थकबाकीमुक्त झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

किमान चालू बिले भरा - महावितरण
शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल ४ हजार ३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. तसेच आर्थिक संकट गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details