महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महावितरणमध्ये यापुढे बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद; कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घेतला निर्णय - MSEDCL take strict action against corona

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून महावितरणच्या सर्व कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करण्यात आली आहे. तसे परिपत्रकच महावितरणकडून काढण्यात आले आहे.

बायोमेट्रिक हजेरी पद्धत
बायोमेट्रिक हजेरी पद्धत

By

Published : Mar 6, 2020, 3:25 AM IST

Updated : Mar 6, 2020, 7:31 AM IST

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसला घाबरू नका असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, याच कोरोना व्हायरसचा धसका राज्यातील महावितरण कंपनीने देखील घेतला आहे. व्हायरसचा संसर्ग होऊ नये, म्हणून महावितरणच्या सर्व कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करण्यात आली आहे. तसे परिपत्रकच महावितरणकडून काढण्यात आले आहे.

चीनच्या हुवांग प्रांतात सुरुवातीला निदर्शनास आलेला कोरोना व्हायरस आता जगभरात पसरला आहे. या व्हायरसने हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचे भारतातही जवळपास ३० रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र आणि मुंबईत हा व्हायरस पसरू नये, म्हणून पालिका आणि राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्याबाबत आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसला घाबरू नका असे आवाहन नागरिकांना केले आहे. यावेळी सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.

एकीकडे राज्य सरकार नागरिकांना घाबरू नका, असे आवाहन करत आहे. दुसरीकडे मात्र महावितरण कंपनीने परिपत्रक काढून कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून पुढील आदेश येईपर्यंत बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. कोरोना हा व्हायरस संसर्गजन्य आहे. आरोग्यविषयक बाब असल्याने कोरोनाचा प्रसार महावितरणच्या कार्यालयामध्ये होऊ नये, म्हणून कंपनीच्या सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. हे परिपत्रक महावितरणचे महाव्यवस्थापक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या नावाने काढण्यात आले आहे.

हेही वाचा - अ‌ॅक्सिस बँक प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस

Last Updated : Mar 6, 2020, 7:31 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details