मुंबई -सुमित कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या, अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या व नैतिक अधःपतनाच्या गंभीर तक्रारी असल्याबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. (Mahavitaran officers Suspended) या लक्षवेधीवर चर्चेत आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, प्रकाश सुर्वे, अशोक उईके यांनी भाग घेतला.
सुमित कुमार यांना तत्काळ निलंबित - सुमित कुमार यांच्याविरुद्धच्या आरोपांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्यावतीने चौकशी करण्याची मागणी या आमदारांनी केल्यानंतर या मागणीला उत्तर देताना सुमित कुमार यांना तत्काळ निलंबित करीत असल्याची घोषणा डॉ. राऊत यांनी केली
एसीबी'कडून पुढील चौकशी - "संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सुमित कुमार यांच्याविरुद्धच्या आरोपांची चौकशी केली जाईल आणि या चौकशीत काही तथ्य आढळल्यास लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)कडून पुढील चौकशी व कारवाई केली जाईल,"अशी घोषणाही डॉ. राऊत यांनी केली.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय - सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास पाठविण्याबाबत महावितरणला सूचना देण्यात आल्या असून सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात येईल व अहवाल प्राप्त झाल्यानंतर छाननीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहाला सांगितले.
हेही वाचा - Raut On Modi : राऊत कडाडले! म्हणाले, दिल्लीतील पुतीनचा आमच्यावर CBI, ED नावाच्या मिसाईलने हल्ला