मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडलसुरू करण्यात आले आहे. सदर ट्विटर हँडलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तर आयोगाकडून टि्वटरवर रिप्लायचा ऑप्शन बंद करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या टि्वटर खात्याला टि्वटरकडून अधिकृत खाते असल्याचे दर्शवणारी ‘ब्ल्यू टिक’देण्यात आलेली नाही.
‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019,-सहायक कक्ष अधिकारी‘ चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती टि्वटरद्वार देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे टि्वट करून आयोगाने सांगितले.
कोरोनामुळे एमपीएससीची परीक्षा सतत पुढे ढकलली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात रोष निर्माण झाला होता. परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. परीक्षेत अनिश्चितता निर्माण झाल्याने नैराश्यात जाऊन अनेक तरुणांनी आत्महत्या केली होती. यानंतर आयोगाने 4 सप्टेंबरला MPSC ची संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला.
4 सप्टेंबरला MPSC ची संयुक्त पूर्वपरीक्षा -