नवी मुंबई- एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील विविध आठ कंपन्यांना नोटीस देऊन कारवाई केली आहे. तळोजा, खारघर व कळंबोलीतील वायू प्रदूषणाच्या स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. शिवाय जन आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाई नंतर देखील खारघर, कळंबोली व तळोजा येथील वायू प्रदूषण थांबले नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.
अखेर एमपीसीबीची तळोजामधील कारखान्यांवर कारवाई - Taloja MIDC news
तळोजा, खारघर व कळंबोलीतील वायू प्रदूषणाच्या तक्रारीनंतर नागरिकांनी घेतलेल्या जन आंदोलनाच्या पवित्र्यानंतर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील विविध आठ कंपन्यांना नोटीस देऊन कारवाई केल्याचे सांगीतले.
नोटीस देऊन कारवाई केलेल्या शितगृहामध्ये अल फैजान मरीन प्रॉडक्ट्स, स्टार फिश मिल ॲन्ड ऑईल कंपनी, ग्लोबल मरीन एक्सपोर्ट्स ही शितगृहे असून कैरव केमोफर्ब इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा समावेश आहे.
एमपीसीबीने हे चार प्रकल्पांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रकल्प बंद करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. तसेच आयजीपील कंपनीसंदर्भात नेमकी कोणती कारवाई करावी, यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठविला आहे. तिसऱ्या टप्यात एमपीसीबीने हायकल कंपनीसह महावीर केमीकल या प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. तसेच विविध कारखान्यांमधील रासायनिक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावताना नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.