मुंबई - विखे पाटील आणि पवार या दोन कुटुंबीयांमधलं राजकीय वैर महाराष्ट्राला ठाऊक आहे. दोन्ही कुटुंबातले वाद, जुन्या पिढीत एकमेकांशी असलेलं राजकीय वैर त्याचे काही दिवसांपूर्वी उमटलेले राजकीय पडदास या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. मात्र अशात चर्चेचा विषय ठरतो आहे तो सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी एकत्र औरंगाबाद ते मुंबई केलेला विमान प्रवास आणि त्यानंतर सुजय विखेंनी शेअर केलेला फोटो.
Friendship Beyond Boundaries : खासदार सुजय विखेंनी शेअर केले पार्थ पवारांसोबतचे फोटो - sujay vikhe and parth pawar photo
अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची शनिवारी औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. त्यानंतर या दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. औरंगाबाद ते मुंबई हे दोघे सोबत आहे. त्याच विमान प्रवासाचा फोटो सुजय विखे पाटील यांनी शेअर केला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची शनिवारी औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. त्यानंतर या दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. औरंगाबाद ते मुंबई हे दोघे सोबत आहे. त्याच विमान प्रवासाचा फोटो सुजय विखे पाटील यांनी शेअर केला आहे. Friendship Beyond Boundaries.. असं टायटल देऊन सुजय विखे पाटील यांनी हा फोटो ट्विट केला आहे जो सध्या ट्विटरवर आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. पार्थ पवार आणि सुजय विखे पाटील या दोन नेत्यांमध्ये विमान प्रवासादरम्यान गप्पांची मैफल रंगली. तसंच सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा झाल्याचंही समजतं आहे. या दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांच्या शेजारी बसून प्रवास केला. सुजय विखे पाटील यांनी फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही समाज माध्यमांवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांनी लाईक्स, कमेंट्स यांचा वर्षावर केला आहे. एका युझरने तर लवकरच बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे विरूद्ध पार्थ पवार यांची लढत होऊ शकते असंही लिहून टाकलं आहे. तर पार्थ पवारांनी पक्ष बदलला की सांगा असंही काही जणांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात राजकीय विरोधी भूमिका असल्या, राजकीय मतभेद असले तरीही व्यक्तिगत पातळीवर सगळे एकमेकांशी चांगले संबंध ठेवून असतात. सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो व्यक्तिगत पातळीवर अनेक नेत्यांचे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध असतात. महाराष्ट्रात आत्ताच नाही तर खूप वर्षांपासून हीच परंपरा आहे. ही परंपरा कायम असल्याचंच सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी दाखवून दिलं आहे. हा फोटो आज दिवसभर चर्चेचा विषय ठरणार यात काही शंका नाही असंच दिसतं आहे.