मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस म्हणून साजरा करण्याचे सांगितले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपाला चिमटा काढला आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून या वेदना कमी केल्या. भाजपाचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते. त्यांनी हे स्वप्न पूर्ण करून फाळणीच्या वेदना कमी कराव्यात, असा सल्ला राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
'ते' स्वप्न पूर्ण करून दाखवा'
लालकृष्ण अडवाणी यांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्या लाहोर आणि कराची आठवणी यावर चर्चा केली. आज हिंदुस्तानात जितके मोजके लोक आहेत, त्यांच्या फाळणीच्या वेदना पाहिल्यात आणि अनुभवले आहेत. जे पंजाबमधून आले, लाहोर मधून आलेले, पाकिस्तानातून आलेले, सिंध प्रांतातून आलेले सर्वस्व गमावून येथे आले. त्यावर अनेक चित्रपट आणि पुस्तके निघाली ती पण आम्ही प्रत्यक्ष कानांनी ऐकलेले. पंतप्रधान म्हणतात 14 ऑगस्ट वेदनेचा दिवस आहे व ही वेदना हे सदैव आम्हाला आहे. फाळणीची वेदना इंदिरा गांधी यांनी थोड फार कमी केले. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून दाखवून दिले. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न हे भारतीय जनता पक्षाचा आहे. ते त्यांनी पूर्ण करावे आणि ही वेदना त्यांनी कायमची दूर करावी.
आमचे काश्मिरी पंडित आजही हजारोच्या संख्येने निर्वासित आहेत. फाळणीच्यानंतर जे लोक इथे आले ते निर्वासित म्हणून जगले. आजही निर्वासितांचे अनेक वस्त्या आहेत. आजही अनेक काश्मिरी पंडित हे निर्वासित म्हणून जगत आहेत. त्यांची घरवापसी कधी होईल. आम्ही अखंड काश्मीर निर्माण करू तो दिवस उगवेल. पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणलं जाईल, तेव्हा ती आमची पाण्याची वेदना कमी होईल. आम्हाला फाळणीची वेदना आहे. मोदींनाही ती अस्वस्थता जाणवली त्यांनी लाल किल्ल्यावरून ते स्पष्ट केले. ही वेदना घेऊन चालणार नाही त्या वेदनेवर उपचार करण्यासाठी तुम्हाला अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आहे ते पूर्ण करावे लागेल. पाकव्याप्त काश्मीर किंवा काश्मिरी पंडित वापसीचा प्रश्न मार्गी लावावा लागेल, तरच ही वेदना कमी होईल. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला तोडून बांग्लादेश बनवला. फक्त 14 ऑगस्टला वेदना नाही, तर 365 दिवस वेदनेला ठेवू शकतो.
'मोहन भागवत यांच्या मताशी सहमत'
जोवर आपण चीनवर अवलंबून आहोत, तोवर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागणार. अफगाणिस्तानातील तालिबानी राजचे समर्थन हे सर्वात आधी चीनने केले आहे. चीन आजवर आपल्यासाठी डोकेदुखी बनून राहिला आहे. आजही आपले आर्थिक व्यवहार हे चीनवर अवलंबून आहे. चीनची आर्थिक परिस्थिती आपल्यावर अवलंबून आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. त्यावर सरकारने विचार करायला हवा. गलवानमध्ये आपले अनेक सैनिक मारले गेले, तेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही हा मुद्दा उचलला होता. ट्रेड आणि आर्थिक व्यवहार व्यापार चीन सोबत आहे, तो संपवायला हवा. आत्मनिर्भर होऊन चीनसोबत स्वप्न नातं जोडायला हवं. जेव्हा पंतप्रधान म्हणतात तेव्हा चीनशी व्यापार तोडून आत्मनिर्भर होण्यास मार्ग हा तिथून सुरू होतो. मोहन भागवत यांच्या मताशी आम्ही सगळेच सहमत आहोत, असेही राऊत म्हणाले.