महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut Reply : महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र - संजय राऊत

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर व मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. तुम्ही एकतर्फी काम करत आहात, विरोधी पक्षनेता हा राज्याच्या जनतेची भूमिका मांडत असतो हे विरोधी पक्षनेते विसरलेले दिसत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Mar 9, 2022, 11:53 AM IST

Updated : Mar 9, 2022, 1:22 PM IST

मुंबई - भाजपचा महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) केला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर व मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत

आरोप करणे त्यांचे कामच-

राऊत म्हणाले की, आरोप करणे हे विरोधी पक्षनेते यांचे कामच असते. त्यामुळे ते त्यांचे काम करत आहेत. महाराष्ट्राचे पोलीस असे कधी करणार नाहीत. कारण, महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगले प्रशिक्षण आहे. राज्याच्या पोलिसांची एक खासियत आणि प्रतिष्ठा आहे की ते कधी कोणाच्या दबावाखाली खोट्या कारवाया करत नाहीत.

खोटे पुरावे, खोटे साक्षीदार, केंद्रीय तपास यंत्रणांचे काम

बदनाम करण्यासाठी आम्हाला पोलिसांचा वापर करण्याचे कुंभांड करायचे असेल तर त्यांना ईडी आणि सीबीआयकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावे लागेल. खोटे पुरावे, खोटे साक्षीदार कसे उभे करायचे हे केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आहे. ते त्यांना चांगले जमते. ही स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे? भाजपाचे सलीम-जावेद कोण आहेत? त्यातली पात्र कोण आहेत? नेपथ्य कोणाचे आहे? दिग्दर्शन कोणाचे आहे? त्याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन समोर येईल, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.

पुरावे सादर करायला अभ्यास किंवा संयम लागत नाही-

राऊत म्हणाले की, पुरावे सादर करायला अभ्यास किंवा संयम लागत नाही. ती तेवढ्यापुरती सळसळ असते आणि खळबळ असते. खळबळ माजवणे हाच जर हेतू असेल विरोधी पक्षाचा, तर ती खळबळ देखील माजलेली नाही.

याला खळबळ म्हणतात-

काल मी ईडीवरती पुराव्यांसह काही आरोप केले आहेत ते खळबळजनक आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई आणि महाराष्ट्रात काय काम करत आहेत त्यांच्या खंडणीखोरीची प्रकरणे समोर आलेली आहेत. त्यावर फडणवीस का बोलत नाहीत? राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईंचा अपमान केला, त्यावर काही भूमिका घेतली असती तर त्यांच्या कालच्या पेन ड्राईव्हला काही महत्त्व आले असते. तुम्ही एकतर्फी काम करत आहात, विरोधी पक्षनेता हा राज्याच्या जनतेची भूमिका मांडत असतो हे विरोधी पक्षनेते विसरलेले दिसत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Last Updated : Mar 9, 2022, 1:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details