महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपने शरद पवार यांना राष्ट्रपती पदाची संधी द्यावी - संजय राऊत - latest Marathi news

देशात राष्ट्रपतीपदाच्या ( Presidential Election 2022 ) उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. बऱ्याच पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर मन मोठे करुन भाजपनेच शरद पवार यांना राष्ट्रपती पदाची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Jun 14, 2022, 4:35 PM IST

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) -देशात राष्ट्रपतीपदाच्या ( Presidential Election 2022 ) उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. बऱ्याच पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर मन मोठे करुन भाजपनेच शरद पवार यांना राष्ट्रपती पदाची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. संजय राऊत हे आयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी ते प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

काँग्रेसचा पवारांना पाठिंबा -राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा पाठिंबा राहील असे काँग्रेसचे मत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्राची व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे”. दुसरीकडे गुलाम नबी आझाद यांचे नाव काँग्रेस पुढे करणार असल्याचीही केंद्रीय राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनीही शरद पवारांना रविवारी फोन केला होता. त्यांनीही शरद पवार यांना राष्ट्रपती पदासाठी आग्रह धरला आहे.

काँग्रेससह इतर विरोधकांची मोर्चेबांधणी - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्या दि १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. या बैठकीत निवडणुकीसाठीच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीत कुणाचे किती बळ -राष्ट्रपती निवडणुकीत ४८ टक्के मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.

तृणमूल काँग्रेसची भूमिका - तृणमूल काँग्रेसने सर्वसमावेशक उमेदवार राष्ट्रपती निवडणुकीत असावा अशी भूमिका घेतली आहे. टीएमसी एका अशा राजकीय व्यक्तीसाठी दबाव आणत आहे जो काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) कधीही भाग नसलेल्या विरोधी पक्षांपर्यंतही पोहोचू शकेल. त्यामुळे शरद पवार हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव तसेच बिजू जनता दल (BJD) प्रमुख आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्यासाठी ओळखले जातात म्हणून ते तृणमूलच्या पसंतीत बसतात. दक्षिणेतील राज्यांच्या प्रमुखांशीही पवार बोलून त्यांची मोट बांधू शकतात त्यामुळे पवार जरी नको म्हणत असतील तर जर मतांचे गणित जुळले तर ते या निवडणुकीत बाजी लाऊ शकतात.

राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम - राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५ लाख ४३ हजार २३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५ लाख ४३ हजार २०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १० लाख ८६ हजार ४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदार राज्यांमध्ये विधानभवनात मतदान करतील.

हेही वाचा -Presidential Election 2022 : शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत : राष्ट्रवादी

ABOUT THE AUTHOR

...view details