मुंबई -शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ खडसे यांच्या शिवसेने सोबत संपर्कात असण्याच्या विधानाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पक्षाचे संघटन हे एक कुटुंब असतं आणि ते टिकले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे दुसऱ्यांचा पक्ष फुटतोय म्हणून आनंदाच्या उकाळ्या फुटणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया.... हेही वाचा... #CAA: २६ वर्ष वाट बघितली तरी कायदा रद्द होणार नाही; अनुराग ठाकूर यांचा ओवैसींना टोला
काँच के घर में रहने वाले दुसरों कें घर पर पत्थर नहीं फेकते...
शिवसेनेने विचारांशी प्रतारणा केली, म्हणणाऱ्या भाजपनेच काश्मीरमध्ये पीडीपीसोबत विचारांशी समझोता केला. त्यामुळे भाजपने आम्हाला शिकवू नये, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच 'काँच के घर में रहने वाले दुसरों कें घर पर पत्थर नहीं फेकते' असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
हेही वाचा... 'मुस्लीम समुदायाला भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरु'
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट ही सदिच्छा भेट होती. राज्यातील आणि देशातील राजकारणावर आम्ही चर्चा केल्याचे राऊत यांनी शरद पवाराची घेतलेल्या भेटीबाबत स्पष्ट केले आहे. तसेच खाते वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. सरकार नीट चालले आहे, ते महत्वातचे. खाते वाटप काय आज अथवा उद्या होईल, असेही राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा... सत्तेसाठी लाचार शिवसेना सावरकरांच्या मुद्यावर गप्प का?