महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 5, 2022, 1:06 PM IST

Updated : Feb 6, 2022, 2:50 AM IST

ETV Bharat / city

Kirit Somaiya On Covid Center Scam : 'संजय राऊत मित्र परिवाराचा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा'

संजय राऊत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह 100 कोटी रुपयांचा जंबो कोविड घोटाळा केल्याचा ( Covid Center Scam ) आरोप किरीट सोमैया यांनी केला ( kirit Somaiya On Sanjay Raut ) आहे. तसेच, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणला याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

kirit Somaiya On Sanjay Raut
kirit Somaiya On Sanjay Raut

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया ( Bjp Leader Kirit Somaiya ) यांनी आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ( Mp Sanjay Raut ) आणि त्यांच्या मित्रपरिवाराने 100 कोटी रुपयांचा जंबो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी ( Covid Center Scam ) केला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणला चौकशी करण्याची मागणीही सोमैया यांनी केली आहे.

किरीट सोमैया म्हणाले की, "खासदार संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकरांची लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसेस ही बनावट कागदी कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड कोविड सेंटरचे कंत्राट घेण्यात आले. हे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. ईडीने केलेल्या झापेमारी दरम्यान याबाबतची कागदपत्रे सापडल्याचे त्यांनी म्हटलं."

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला लिहलेल्या पत्रात सोमय्या म्हणतात की, "मुंबई महापालिकेने वैद्यकीय कर्मचारी पुरवण्यासाठी आणि प्रत्यक्षात कोविड केंद्रे चालवण्यासाठी लाइफलाइन रुग्णालयाला देण्यात आली. दहिसर, NSCI वरळी, मुलुंड, रेसकोर्स महालक्ष्मी केंद्राचे कंत्राट लाइफलाइनला दिले. जून 2020 च्या तिसऱ्या आठवड्यात, कागदपत्रांची तपासणी करताना असे आढळून आले की लाइफलाइन हॉस्पिटल व्यवस्थापन सेवा अस्तित्वात नव्हती. MCGM ला कोणतेही दस्तऐवज, योग्य अर्ज, अनुभवाचे प्रमाणपत्र, काहीही मिळाले नव्हते, परंतु या केंद्राला आंधळेपणाने कंत्राट वाटप केले. MCGM आणि या कंपनीमध्ये प्रत्यक्ष करार कधीच झाला नव्हता."

बनावट करार केल्याने कोविड रूग्णांचे प्राण गेले

महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिका, पुणे विकास व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे महानगरपालिका आणि इतर अशा संस्थांनी कोविड केंद्रे चालवण्यासाठी आणि वैद्यकीय कर्मचारी/सेवा पुरवण्यासाठी विविध कंपन्यांना कंत्रात दिले होते. यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने सेवा पुरवल्या गेल्या नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्राण गेले, असा आरोपही सोमैयांनी केला आहे.

हेही वाचा -Jammu Kashmir Terrorist Encounter : श्रीनगरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

Last Updated : Feb 6, 2022, 2:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details