महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MP Rahul Shewale in Trouble : बंडखोर खासदार राहुल शेवाळेंच्या अडचणीत वाढ; पीडित महिलेच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल

नुकतेच गटनेतेपदी नियुक्ती झालेल्या बंडखोर खासदार राहुल शेवाळे ( Shiv Sena Rebel MP Rahul Shewale ) यांच्या अडचणीत वाढ ( MP Rahul Shewale in Trouble ) होण्याची शक्यता आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करीत महिलेने पोलिसांचे ( Sakinaka police station ) दरवाजे ( Woman Filed Written Complaint ) ठोठावले. मात्र, पोलिसांकडून दखलच घेतली जात नाही. त्यामुळे संबंधित महिलेने महिला आयोगाकडे धाव घेत, तक्रार दाखल केली. महिला आयोगाने या ( Chairperson Rupali Chakankar ) तक्रारीची दखल घेतल्याने बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढ होण्याचे शक्यता आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ( Chairperson Rupali Chakankar ) यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना ( MP Rahul Shewale in Trouble ) पत्र लिहीत याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Shiv Sena Rebel MP Rahul Shewale
बंडखोर खासदार राहुल शेवाळे

By

Published : Aug 5, 2022, 7:02 AM IST

मुंबई : शिवसेना बंडखोर खासदार राहुल शेवाळे ( Shiv Sena Rebel MP Rahul Shewale ) यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करीत मानसिक त्रास दिल्याचा आरोप करीत एका महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात ( Sakinaka Police Station ) लेखी तक्रार दाखल ( Woman Filed Written Complaint ) केली होती. या तक्रारीबाबत कारवाई होत नसल्याने आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ( Chairperson Rupali Chakankar) यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना ( MP Rahul Shewale in Trouble ) पत्र लिहीत याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.


साकीनाका पोलिसांकडून कारवाईस विलंब : खासदार राहुल शेवाळे यांच्याविरुद्ध एका युवतीने दाखल केलेल्या तक्रारीबाबत साकीनाका पोलीसांकडून कारवाई होत नसल्यामुळे पीडित युवतीने राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती. त्याबाबत गुरुवारी आज रोजी राज्य महिला आयोगाच्या मुंबई कार्यालयात बैठक घेण्यात आली. पीडित युवतीला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने ती मुंबईत येऊ शकत नाहीत, असे कळविल्याने त्यांनी गुरुवारी दि. 4 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज आपली बाजू मांडली.

महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ : एप्रिल 2022 पासून ही पीडित तरुणी पोलिसांनी तिची तक्रार घ्यावी म्हणून सातत्याने विनंती करूनही पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचे चित्र दिसून आले. तसेच, राजकीय दबावामुळे कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे सदर तक्रारीबाबत साकीनाका पोलीस कारवाई करण्यास सक्षम नसल्याचे आयोगाकडून नमूद करण्यात आले आहे. यासंबंधी वरिष्ठ स्तरावरून तपास करण्यात यावा, त्यासंबंधी मुंबई पोलीस आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन याबाबतीत योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे पत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाद्वारे पाठविण्यात आले आहे.


महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली तक्रार : बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करीत महिलेने पोलिसांचे दरवाजे ठोठावले. मात्र, पोलिसांकडून दखलच घेतली जात नाही. त्यामुळे संबंधित महिलेने महिला आयोगाकडे धाव घेत, तक्रार दाखल केली. महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेतल्याने बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढ होण्याचे शक्यता आहे. अशा प्रकरे पोलिसांकडून तक्रार घेण्यासदेखील विलंब होणे, हे महिलांच्या सुरक्षेला हानिकारक असल्याने महिला आयोगाने याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना केल्या.



राहुल शेवाळेंनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून ठेवले संबंध : सेनेचे बंडखोर खासदार आणि शिंदे गटाचे समर्थक राहुल शेवाळे यांनी पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबध ठेवले. आता संबंधित पीडितेने शेवाळे यांनी फसवणूक करीत बलात्कार केल्याचा आरोप करीत साकीनाका ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. शेवाळे आणि संबंधित पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ पोलिसांकडे पुरावे म्हणून सादर केले. मात्र, पोलिस आता तक्रार घेत नसल्याचा आरोप संबंधित पीडितेने केला आहे. त्यामुळे महिला आयोगाकडे धाव घेऊन शेवाळेंवर कारवाई मागणी केली.


पीडित महिलेला वारंवार धमक्या : दरम्यान, अर्जदार युवतीला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्या मुंबईत येऊ शकत नाही, असे महिला आयोगाला कळवले. त्यामुळे आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिने आपली बाजू मांडली. एप्रिल 2022 पासून पोलिसांनी तिची तक्रार घ्यावी म्हणून सातत्याने विनंती करूनही पोलिसांनी तक्रार घेत नाहीत. राजकीय दबावामुळे कार्यवाही होत नाही, तक्रारीबाबत साकीनाका पोलीस कारवाई करण्यास सक्षम नाहीत, असे महिला आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला आयोगाने वरिष्ठ स्तरावरून तपास करावा. मुंबई पोलीस आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन, योग्य ती कारवाई करावी, असे पत्र पाठवले आहे. महिला आयोगाच्या पत्रामुळे राहुल शेवाळे यांचा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बंडखोर खासदार राहुल शेवाळेंचा राजकीय प्रवास :ठाकरे यांचे विश्वासू असलेले आणि विद्यार्थिदशेपासून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या शेवाळे यांचे शिंदे गटात सहभागी होणे, अनेकांसाठी धक्कादायक होते. शाखाप्रमुख ते खासदार ही राजकीय वाटचाल त्यांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली केली आणि शिवसेनेच्या नगरसेविका कामिनी मयेकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन, त्यांनी शिवसेनेतच सोयरीक केली. सायनमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले शेवाळे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकारणात आले. पुढे ते मानखुर्द परिसरातून नगरसेवक झाले.

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद : सन २००५ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले असले, तरी बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. काही लहान राज्यांपेक्षाही अधिक मोठा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या उद्धव ठाकरे यांनी सलग चार वर्षे शेवाळे यांच्या हाती सोपविल्या. सन २०१४ आणि २०१९मध्ये दक्षिण मध्य मुंबईतून ते दोन वेळा खासदार झाले. आता खासदारांच्या गटनेतेपदी नियुक्ती झाली असतानाच, आता महिलेने शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : Chota Shakeel brother-in-law arrested : गँगस्टर छोटा शकीलचा निकटवर्तीय सलीम फ्रुटच्या एनआयएने आवळल्या मुसक्या

ABOUT THE AUTHOR

...view details