महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MP Navneet Rana : खासदार नवनीत राणांची न्यायालयात धाव ; शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप - खासदार नवनीत राणा

खासदार नवनीत राणांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली ( MP Navneet Rana in Mumbai Sessions Court ) आहे. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे.

MP Navneet Rana
खासदार नवनीत राणा

By

Published : Sep 16, 2022, 12:27 PM IST

Updated : Sep 16, 2022, 2:01 PM IST

मुंबई :खासदार नवनीत राणांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली ( MP Navneet Rana in Mumbai Sessions Court ) आहे. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप ( Navneet Rana Caste verification case ) आहे. त्यांच्या जात पडताळणी संदर्भातील शिवडी अधिकारी न्यायालयात सुरू असलेला खटला लवकरात लवकर निकाली काढण्याकरिता सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या अर्जावर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार ( Navneet Rana rushed to Mumbai Sessions Court ) आहे.

विशेष न्यायालयासमोर फौजदारी पुनर्विचार याचिका दाखलअमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र प्रकरणाशी संबंधित न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. खासदार नवनीत राणा यांनी विशेष न्यायालयासमोर फौजदारी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. खा. नवनीत राणा उर्फ ​​नवनीतकौर हरभजन सिंग कुंडेल यांच्या विरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


खा.नवनीत राणा यांच्या विरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत आणि हरभजन सिंग रामसिंग कुंडलेशिवाय तिचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहे. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे.

दंडाधिकारी न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखलवरिष्ठ वकील शब्बीर शोरा, वकील रिजवान मर्चंट यांनी नवनीत राणा यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे. नवनीत राणा यांचे स्वीय सचिवही न्यायालयात हजर होते. या प्रकरणाची यापूर्वी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली होती. खासदार आणि विधानसभेचे सदस्य आमदार यांचा समावेश असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी विशेष दंडाधिकारी न्यायालयाच्या स्थापनेनंतर हे प्रकरण वर्षभरापूर्वी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते.


आरोपी नवनीत राणा यांनी दंडाधिकारी न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयात आरोपीच्या सतत अनुपस्थितीमुळे दंडाधिकारी न्यायालयाने 4 मे 2022 रोजी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. त्यावेळी नवनीत राणा यांना हनुमान चालिसा प्रकरणात राणा दांपत्य तुरुंगात होते, असे देखील सांगण्यात आले आहे.


तरीही 2 जून रोजी न्यायालयाने आरोप निश्चित करून आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आरोपी अनुपस्थित असताना देखील सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी आरोपींनी दाखल केलेला सूट अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. आणि त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मात्र 25 ऑगस्ट रोजी नवनीत आणि तिचे वडील न्यायालयात हजर होते. वॉरंट रद्द करताना न्यायालयाने म्हटले प्रत्येकी रुपये २००/- दंडाच्या भरून वॉरंट रद्द करण्यात आला होता. वॉरंट रद्द झाल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी हे प्रकरण आरोप निश्चित करण्यासाठी ठेवण्यात आले आहे.

Last Updated : Sep 16, 2022, 2:01 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details